Breaking News

बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने बहन कुमारी मायावती यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

निमगाव केतकी :- ( ता. इंदापूर ) बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने  दि .15 जानेवारी 2024 रोजी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आयरन लेडी बहन कुमारी मायावती जी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून विधानसभेच्या वतीने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला .बहेण कुमारी मायावती जी यांचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये सामाजिक उपक्रम राबवून वेग वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बहुजन समाजातील लोकांना कॅडरच्या माध्यमातून फुले ,शाहू ,आंबेडकर विचारधारा सांगून शेवटी केक कापून निमगाव केतकी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

 यावेळी कॅडर कॅम्पच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीची कार्यप्रणाली आणि महापुरुषांचे विचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मा.प्रदेश सचिव अजित ठोकळे यांनी सत्ता प्राप्त  करो अभियाना अंतर्गत "संविधान रक्षण" संकल्प यात्रेला सुरुवात केली.

 या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष मा. श्रीपती दादा चव्हाण ,विधानसभेचे अध्यक्ष  मनेशजी कांबळे, पार्टी युवा अध्यक्ष अनिकेत जी मिसाळ, सुमित मिसाळ महासचिव दीपक सावंत, बामसेफ चे प्रमोद चव्हाण, सागर मिसाळ योगेश मिसाळ, सोमनाथ मिसाळ, बाबू कोळी ,रवी मिसाळ तसेच आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत