ह. भ. प .सौ. शुभांगी सोमनाथ जाधव काशीकर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्काराने सन्मानित
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
बारामती :- बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील हभप शुभांगी सोमनाथ जाधव काशीकर यांना दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी नाशिक येथे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन व कमल म्युझिक प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा त्यांच्यावरती वर्षाव होत आहे.
गरीब कुटुंबात प्रपंचाची जबाबदारी पार पाडत समाजाचे देणं लागतो या उद्देशाने त्या पंचक्रोशी साहित्य मंडळ वतीने साहित्य क्षेत्रासाठी निस्वार्थी कार्य करीत असतात.त्याच बरोबर सामाजिक भान ठेऊन महिलांना अध्यात्माची ओळख करून देत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन जनजागृती करत असतात.
कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन व कमल म्युझिक प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोक कवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिक मध्ये कलावंत पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक वाचनालय नेहरू गार्डन शालिमार नाशिक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते धनंजय वाबळे त्याचबरोबर सामनाचे विश्वस्त प्राचार्य सोमनाथ मुठाळ ,अभिनेते प्रमोद पंडित, दिग्दर्शक नामवंत कलाकार तसेच अशोक सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र राज्यातून वीस नामवंत कलाकारांना राज्य स्तरीय कलावंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
मंगला वीरशिद यांनी सूत्र संचालन केले.तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुनील मोंढे सर यांनी आभार प्रदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत