जानकर वस्ती, नरूटेवस्ती, देशमुख वस्ती (पश्चिम बाजू), माने वस्ती येथे सिंगल फेजचा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी मा.नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांचे बुधवारी रास्ता रोको आंदोलन
सांगोला/प्रतिनिधीः
सांगोला शहरातील रेल्वे गेटच्या पश्चिमेकडील जानकर वस्ती , नरूटेवस्ती व पंढरपूर रोड देशमुख वस्तीच्या पश्चिमेकडील नाथा सरगर वस्ती (देशमुख वस्ती), पांडुरंग माने वस्ती, दगडू जानकर वस्ती, येथे सिंगल फेज चे नवीन ट्रान्सफार्म बसवून वीज पुरवठा शहराप्रमाणे करावा अन्यथा बुधवार दि. 24 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता मिरज-पंढरपूर हायवेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नागरीकांसह रास्ता रोको आंदोलन करणार असलेबाबतचे निवेदन सांगोला नगरपालिकेचे मा.नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांसह लोक प्रतिनिधींना दिले आहे.
सांगोला शहरातील रेल्वे गेटच्या पश्चिमेकडील जानकर वस्ती , नरूटेवस्ती व पंढरपूर रोड देशमुख वस्तीच्या पश्चिमेकडील नाथा सरगर वस्ती (देशमुख वस्ती), पांडुरंग माने वस्ती, दगडू जानकर वस्ती, हा भाग शहरात असून या भागात नागरिक मोठ्या प्रमाणात वास्व्यास आहेत. परंतू या भागात शहराप्रमाणे सिंगल फेज चा विद्युत पुरवठा होत नाही, ग्रामीण प्रमाणे विद्युत पुरवठा होत आहे , नागरिकांना 8 तास विद्युत पुरवठा होतो तोही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रिज, कुलर, फॅन यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक होत आहेत. यापुर्वी शहरातप्रमाणे विद्युत पुरवठा व्हावा यासाठी अनेक आंदोलने केली, अनेक वेळा निवेदने दिली परंतू कसलीही दखल घेतली नाही या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात शहराप्रमाणे सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफार्म बसवून विद्युत पुरवठा करावा या मागणी साठी बुधवार दि. 24 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता मिरज-पंढरपूर हायवेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नागरीकांसह रास्ता रोको आंदोलन करणार आहे अशा प्रकारचे निवेदन मा.नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांनी जिल्हाधिकारीसाो, सोलापूर, आमदार अॅड.शहाजीबापू पाटील, मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता,तहसिलदार सांगोला, पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत