पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे काम चांगले पण त्यांना विरोध करणारे समाजसेवक यांनी ब्लॅकमेलिंग चा धंदा बंद करावा - राकेश पाटील (तालुका उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष)...
मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रणजीत माने साहेब यांचे काम जनतेसाठी चांगले आहे पण समाजसेवेच्या नावाखाली काम करणारे पुढारी यांची ब्लॅकमेलिंग बंद पडली त्यामुळे पोलीस निरीक्षक च्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत आता दररोज पोलीस निरीक्षक यांचे सत्कार होत आहेत कारण त्यांनी घर फोड्या, मोटरसायकल चोर ,गुटखा पकडणे , विविध तंटे, तपास अशा विविध प्रकारची चांगली कामे केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर जनता खुश आहे पण भुरटे सुरटे किंवा ज्यांना गावात किंमत नाही ते आज म्हणत आहेत सत्कारापेक्षा काम करा अन्यथा संघर्ष अटळ असा सवाल करीत आहेत पण त्यांचे काम बघूनच वरिष्ठ अधिकारी यांनी माने साहेब यांचा सन्मान, गौरव केला आहे त्यामुळे त्यांचा सत्कार ही मंगळवेढ्यातील जनता करीत आहे काही पुढाऱ्यांची चुलबंद पडली आहे त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे ब्लॅकमेलिंग चा धंदा सुरू केला आहे मंगळवेढा तालुक्यातील जनता ही डोळ्याने बघत आहे एकीकडे अधिकारी व दुसरीकडे जे विरोध करीत आहेत ते पुढारी मग या विरोध करणारा पैकी एकाने तर जनतेच्या प्रश्नासाठी पोलीस निरीक्षक यांना विरोध केला आहे का असा प्रश्न पडत आहे त्यांनी त्यांचे धंदे किंवा वैयक्तिक स्वार्थ बंद केल्यामुळे हे माने साहेब यांच्या विरोधात आवाज उठविला आहे पण जनतेच्या लक्षात आले आहे जे पुढारी विरोध करतात ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत त्यामुळे रणजीत माने यांच्या पाठीशी प्रहार जनशक्ती पक्ष कायमस्वरूपी असणार आहे आमचे दैवत आमदार बच्चू कडू यांचा सवाल असतो की चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करा व चुकीचे
काम करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून द्या त्यामुळे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे काम हे चांगले आहे त्यामुळे सत्कार होत आहेत किंवा प्रहार कडूनही केला आहे त्यांचे काम सुरूच आहे पण जे पुढारी विरोध करीत आहेत किंवा समाजातील तेढ निर्माण करीत आहेत त्यांना प्रहार स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही. अनथ्या खर काय खोटे काय हे दैवत बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत