पुणे (प्रतिनिधी) : ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा महासचिवपदी साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार वृत्तत्राचे संपादक भिमसेन सर्जेराव उबाळे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. करण बौध्द यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी हे निवडीचे नियुक्ती पत्र संघटनेच्या बैठकीमधे दिले असुन. भिमसेन सर्जेराव उबाळे सर हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता, सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भिमसेन सर्जेराव उबाळे सर हे संघाचे नियमांचे अधिन राहून संपादक संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत व तळागळातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत व असतील .
भारत देशातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत कार्यरत असलेल्या वृत्तपत्रांची देश पातळीवरील ऑल इंडिया संपादक संघ ही सक्रिय अशी राष्ट्रीय संघटना असून पुणे जिल्हातील पत्रकार तथा संपादक भिमसेन सर्जेराव उबाळे सर यांची निवड पुणे जिल्हा महासचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल समाजातील सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा