प्रतिनिधी - संतोष कदम.
निरा - नरसिंहपुर :- इंदापूर तालुक्यामध्ये सुरवड या गावी राहणाऱ्या संजीवनी सुरेश मोरे या विद्यार्थिनीने बी इ मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त करून त्यांची आई समिता सुरेश मोरे या हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून काम पाहतात तर संजीवनी यांचे मामा महादेव कांबळे हे गुजरात मध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये साहेब आहेत. संजीवनी यांचे शिक्षण पहिली ते चौथी सुरवड येथे झाले तसेच पाचवी ते बारावीचे शिक्षण शिवाजी विद्यालय बावडा येथे झाले डिप्लोमा विद्या प्रतिष्ठान इंदापूर येथे झाल्यानंतर डिग्री ही एस बी पाटील कॉलेज वनगळी येथे झाली. संजीवनी यांना स्टील स्ट्रॉंग व्हॅल्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गुजरात या कंपनीमध्ये quality depth मध्ये क्वालिटी इंजिनीयर पदावर कायमस्वरूपी घेण्यात आले आहे. त्याच्यामुळे पूर्ण इंदापूर तालुक्यामधून संजीवनी मोरे, त्यांच्या आई समिता मोरे आणि मामा महादेव कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा