Breaking News

०४ एप्रिल २०२३

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गंगापुर आणी लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल..


 प्रतिनिधी - संतोष कदम.

गंगापूर :-  लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून वसू सायगाव येथील सरपंच शांताराम शेजुळ , दिनवाडा ग्रामपंचायत सरपंच शैलेंद्र गायकवाड,  हमाल मापाडी मतदार संघातून  गोविंद शेलार तर व्यापारी मतदार संघातून पंकज कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचं प्रमाणे गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोसायटी संचालक तथा माजी सरपंच काकासाहेब दाणे भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघातून तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल यांनी ग्रामपंचायत मतदार संघ तर जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून अर्ज भरला आहे असुन गंगापूर व लासुर स्टेशन बाजार समितीच्या निवडणुकांचा आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने वंचित बहुजन आघाडी कडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही परंतु दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती गंगापूरची तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक, तर लासुर स्टेशनची जिल्हा सचिव संदीप गायकवाड यांनी दिली आहे उद्या पर्यंत सर्व उमेदवारांची यादी अधिकृत करण्यात येणार आहे.

 यावेळी लासुर स्टेशन प्रसिद्ध व्यापारी वंचित बहुजन आघाडीचे नेते भारतशेठ पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, लिंबे जळगाव सोसायटीचे चेअरमन कारभारी पाटील गोलांडे, वंचित बहुजन आघाडीचे पवन साळवे, अमोल शेजुळ, शहापूर घोडेगाव चे माजी सरपंच  सिकंदर भाई पैलवान,सईद बाबा पठाण, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा