Breaking News

१४ मार्च २०२३

सागर बाबा मिसाळ यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

 जंक्शन :-( ता. इंदापूर ) जंक्शन येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

    सागर बाबा मिसाळ संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना ज्येष्ठ नागरिक ,विधवा माता भगिनी, परीतक्त्या महिला व अपंग बांधवांसाठी तालुक्यात केलेले अफाट काम व या कामाच्या बळावर खासदार सौ. सुप्रियाताई सुळे,माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारडकर यांनी दखल घेऊन सागर बाबा मिसाळ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली.

     नियुक्तीनंतर बोलताना सागर बाबा मिसाळ म्हणाले,की माझ्यावर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब,माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,आमदार दत्तात्रय मामा भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारडकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली या सर्वांचे मी आभारी आहे. भविष्यात या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाचे कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहील व सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवून काम करेन.

     नियुक्तीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा ‌      गारडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे उपस्थित होते.

    सागर बाबा मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल  महाराष्ट्रा मधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून योग्य व सार्थ निवड झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. या नियुक्ती बद्दल निरा नरसिंहपुर येथे पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका यांच्या वतीने सागर बाबा निसाळ यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा