भारताचा दिग्गज डावखुरा फलंदाज सध्या भीषण आर्थिक तंगीत सापडलाय.. कमाईच्या साऱ्या वाटा बंद झाल्याने परिस्थितीपुढे अगदीच हतबल झालाय.. ‘मला काम द्या, मला घर चालवायचंय..’ अशी व्याकूळ विनवणी करण्याची वेळ त्याच्यावर आलीय..
या दिग्गज माजी क्रिकेटपटूचं नाव आहे, विनोद कांबळी.. भारताचा एकेकाळचा हा दिग्गज क्रिकेटपटू सध्या जाॅबच्या शोधात आहे.. क्रिकेटशी संबंधित काम करण्याची त्याची तयारीही आहे.. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ.. अर्थात ‘बीसीसीआय’कडून मिळणाऱ्या ‘पेन्शन’वरच त्याची गुजराण चालू आहे.. तेच एकमेव त्याच्या उत्पन्नाचं साधन आहे.
खरं तर आपल्या अंतरंगी स्टाईलने, तर कधी वक्तव्याने 50 वर्षीय विनोद कांबळी कायमच चर्चेत असतो.. पण, आता तो परिस्थितीपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे.. एका मुलाखतीत त्याने ही बाब मांडली..
कांबळी काय म्हणाला..?
तो म्हणाला, की “मला ‘बीसीसीआय’कडून दरमहा 30 हजार रूपये पेन्शन मिळते. त्यावरच माझे घर चालते.. माझ्या उत्पन्नाचा तो एकमेव स्रोत आहे. मी एक निवृत्त क्रिकेटर आहे. पेन्शनसाठी मी ‘बीसीसीआय’चा खास आभारी आहे. पण, मला कामाची गरज आहे. मला युवा क्रिकेटपटूंसाठी काम करायचंय, त्यांना मार्गदर्शन करायचंय…”
मुंबई क्रिकेटने अमोल मुजूमदार याला मुंबई संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम केलंय. आता मुंबई संघाला जिथे व जशी माझी गरज भासेल, त्यानुसार मी सेवा पुरवण्यास तयार असल्याचेही कांबळी म्हणाला..
तो म्हणाला, की “मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मी मदतीसाठी याचना केली. ‘क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटी’कडेही गेलो होतो, पण तो मानद जॉब होता. मला पैशांची गरज आहे, कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. मी ‘एमसीए’ला सांगितलं, की तुम्हाला माझी गरज भासेल, तेव्हा तुम्ही मला बोलवा. मी सेवा देण्यास तयार आहे.”
वानखेडे असो वा बीकेसी ग्राऊंड असो, मला काम करायला नक्कीच आवडेल. कारण मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिलंय. त्यामुळे आता माझी परतफेड करण्याची वेळ असल्याचंही कांबळी म्हणाला.
सचिन तेंडुलकरला तुझी आर्थिक स्थिती माहित आहे का, या प्रश्नावर तो म्हणाला की, “सचिनला सगळं काही माहित आहे, पण माझी त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीतकाम दिलं होतं, त्याचा मला आनंद आहे. तो चांगला मित्र आहे. माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे..”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा