Breaking News
१८ ऑगस्ट २०२२
माजी आ. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अजनाळे गावात १ हजार २०० वह्यांचे वाटप..
अजनाळे: सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त अजनाळे गावात जवळपास १ हजार २०० वह्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते विष्णू देशमुख यांनी दिली. स्वर्गीय माजी आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अजनाळे गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विकास विद्यालय अजनाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे, अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबडे देशमुख वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवाणमळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती या शाळांमधील जवळपास एक हजार दोनशे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी चेअरमन प्रदीप लाडे, रामभाऊ येलपले,संजय येलपले,अमित शेंबडे, ग्रामपंचायत सदस्य बापू कोळवले, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा