नाझरे येथील मारुती मंदिरात महाआरती संपन्न.. हनुमान भक्तांची हजेरी....! महाबली हनुमान हे भक्ती, शक्ती आणि बुद्धीची देवता..- रविराज शेटे
नाझरे प्रतिनिधी
महाबली हनुमान हे भक्ती, शक्ती आणि बुद्धीची देवता असून, रामायणातील प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता व हनुमान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे व हनुमानाचे महत्त्व याविषयी डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामींनी नाझरे येथे हिंदू संमेलनात महत्त्व सांगितले व ज्या मंदिरात आपण जातो त्या देवाची प्रथम आरती व नंतर हनुमंताची घ्या असे आशीर्वाचनात सांगितले व देवाची , गुरुची, संतांची माहिती समजण्यासाठी असे गुरुच्या प्रवचनाची गरज आहे असे पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले.
हनुमान मंदिरात सध्या तुकाराम चरित्र या पोथीचे वाचन सुरू असून, त्याची महाआरती सौ. लक्ष्मी उर्फ गोदाबाई तमा पाटील यांच्या शुभहस्ते तर महाबली हनुमानाची महाआरती पत्रकार रविराज शेटे यांच्या शुभहस्ते करून आज प्रारंभ करीत आहोत असे हनुमान भक्त भारत शेलके यांनी यावेळी सांगितले. तर रामायणात हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे अनेक प्रसंग आहेत, सीतेच्या शोधासाठी लंकेत जाताना अत्यंत सूक्ष्म रूप धारण केले आणि शत्रूचे नजरेत न येता संपूर्ण लंकेचा अभ्यास केला तसेच संकट समय उपाय शोधण्यासाठी त्यांची क्षमता विलक्षण होती, लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना संपूर्ण पर्वतच उचलून आणला व परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेणे हीच खरी बुद्धिमत्ता दिसून येते असे पोपटराव स्वामी यांनी यावेळी सांगितले. महारतीनंतर डॉक्टर हरिश्चंद्र सोनवणे यांनी महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी बहुसंख्येने हनुमान भक्त हजर होते व दर शनिवारी सायंकाळी आठ वाजता महाआरती कायमस्वरूपी होईल असे हनुमान भक्तातर्फे यावेळी सांगण्यात आले. यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत