Breaking News

नाझरे येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी


नाझरे प्रतिनिधी 

     ग्रामपंचायत नाझरे ता. सांगोला येथे महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच विजय सरगर, शिवया स्वामी सर, आदर्श शिक्षक सिद्धेश्वर झाडबुके, नंदकुमार रायपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

    सदर प्रसंगी शिवया स्वामी सर, नंदकुमार रायचूरे, अमर रायचूरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची माहिती सांगितली. तर नाझरे चौकात प्रतिमेचे पूजन करण्यात आले व वीरभद्र मंदिर येथे प्रतिमेचे पूजन उद्योगपती सुरेश काका चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरोहित म्हणून रविराज स्वामी व बाळासो स्वामी यांनी काम पाहिले. तसेच महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम व पाळणा संपन्न झाला तसेच प्रसाद वाटप करण्यात आला. 

    शासकीय जयंती प्रसंगी मा. उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, मुकुंद पाटील, प्रवीण पाटील, रमेश पाटील, नामदेव बनसोडे, नंदकुमार रायचूरे, अमर तांबोळी, राजू रायचुरे, दीपक शिरदाळे, अरुण रायचुरे, राजू पाटील, बंडू काकडे, नितीन टिंगरे,शिवकुमार रायचूरे, डोंगरे, दादासो सरगर, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रविराज शेटे यांनी तर आभार मा. उपसरपंच नागेश रायचूरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत