आटपाडी, नाझरे, सांगोला, पंढरपूर मार्गे गाणगापूर एसटी बस सुरू. प्रवासी वर्गाचा वाढता पाठिंबा
नाझरे प्रतिनिधी
आटपाडी, नाझरे, सांगोला, पंढरपूर मार्गे गाणगापूर सएसटी बस प्रवासी सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाल्याने भाविक भक्त मंडळीत समाधानाचे वातावरण पसरले आहे व या बसनेच प्रवास करा असे प्रवासी संघटनेचे सदस्य शंकर बंडगर यांनी नाझरे ता. सांगोला येथे एसटी बसच्या स्वागतप्रसंगी मत व्यक्त केले.
सुरुवातीस बसचे ड्रायव्हर व कंडक्टर दादासाहेब नरळे, नितीन सरोदे व प्रवासी संघटनेचे सदस्य शंकर बंडगर यांचा फेटा व हार घालून सरपंच डॉ. विजय सरगर यांनी स्वागत केले. तसेच बलवडी पाटी येथे सोसा. चेअरमन शिवाजी शिंदे, ग्राम. सदस्य कृष्णदेव कारंडे, शिक्षक रेवन बदडे, धनाजी पांढरे, राजेंद्र इ कारे यांनीही बसचे ड्रायव्हर कंडक्टर यांचा सत्कार केला. सदर प्रसंगी शिक्षक नेते अशोक पाटील, भाजपा नेते नंदकुमार रायचुरे, अमर रायचुरे, मा. सरपंच बाबुराव जोंधळे, लक्ष्मण ढोबळे, बंडू माने, दत्तात्रेय जावीर, बबन भडंगे, संतोष निंबाळकर, पत्रकार सुनील जवंजाळ इ. उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार रविराज शेटे यांनी मानले.
आटपाडी नाझरे मार्गे गाणगापूर ही बस सुरू झाल्याने पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट व गाणगापूर या चारी तीर्थक्षेत्री भक्तांना जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, सांगोला आगार प्रमुख विकास पोफळे, प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, पंढरपूर अध्यक्ष कुमार नरखडे यांनी विशेष प्रयत्न केले, तरी भाविक भक्तांनी, विद्यार्थ्यांनी, प्रवासी वर्गानी याचा लाभ घ्यावा.
रविराज शेटे(अध्यक्ष सांगोला तालुका वृत्तपत्र संघटना)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत