महिला शक्ती संघटने कडून रंजना कांबळे यांचा सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी
महिला शक्ती संघटना सांगोला तर्फे आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या श्रीमती रंजना कांबळे यांची कुबेर हेल्थ फाउंडेशन मुंबई सहसचिव पदी निवड झाल्याने महिला शक्ती संघटनेचे अध्यक्ष जयश्री सावंत यांनी शाल, फेटा, हार घालून भव्य सत्कार केला.
श्रीमती रंजनाताई कांबळे यांनी पंधरा ते वीस वर्षे आरोग्य विभागातून प्रामाणिकपणे सेवा केली व त्यामुळे त्यांची निवड झाली असे जयश्री सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. तर आपण आरोग्य विभागातून रुग्णाची सेवा केली व त्याचे फळ आपणास मिळाले व या कामी मला आमच्या सर्व टीमने सहकार्य केले असेच यापुढेही सहकार्य रहावे असे सत्कारमूर्ती रंजनाताई कांबळे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. माधुरी दमानी, ज्येष्ठ मार्गदर्शक मच्छिंद्र चंदनशिवे, मेजर श्रीकांत पवार, रविराज शेटे, कबीर चंदनशिवे, सौ. साधना साळुंखे व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत