नाझरे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी..
नाझरे प्रतिनिधी
महात्मा फुले हे एक महान समाज सुधारक होते, ज्ञान, समता, स्त्री सन्मान, श्रम प्रतिष्ठा आणि मानवतेच्या मूल्यांना त्यांनी नवा प्रकाश दिला. त्यांच्या विचारानुसार ज्ञान माणसाला मुक्त करते, शिक्षण बदल घडवते आणि माणुसकी जीवनाला खरा अर्थ देते म्हणूनच त्यांचे स्मरण हा केवळ उत्सव नसून कृतिशील संकल्प आहे. ज्ञानाचा एक दीप अनेक आयुष्ये उजळवतो हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे तरी माणुसकीची ऊब, परस्पर सन्मान आणि न्याय संधी याची गरज वाढली आहे व या संदर्भात महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक, दीपस्तंभा सारखे भासतात. नाझरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच डॉ. विजय सरगर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन गोरख भाऊ आदाटे यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शिक्षक नेते राजाराम बनसोडे यांच्या शुभहस्ते चौकातील प्रतिमेचे व क्रांतीज्योती पतसंस्थेच्या कार्यालयात मा. प्राचार्य प्रकाश परिचारक यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी असंख्य समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत