चोपडी येथील वन विभागाच्या रानटीपणामुळे 18000 झाडे मोजतायेत अंतिम घटका...! पाण्याअभावी झाडे जळाल्यास तीव्र आंदोलन करणार.. अध्यक्ष गणेश बाबर
सांगोला प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन दर वर्षी पावसाळ्यात झाडे लावा व झाडे जगवा ही मोहीम सर्वत्र राबवीत असून चोपडी ता. सांगोला येथेही मे 2024 मध्ये वनविभागाच्या हद्दीत विविध प्रकारच्या 18000 रोपांची लागण करण्यात आली व वेळोवेळी झालेल्या पावसामुळे झाडांची वाढ सुद्धा चांगली झाली व मे 2025 मध्ये उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे रोपे बळी जाण्याच्या मार्गावर होती व त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थेतर्फे बुद्ध्याळ तलाव प्रकल्प स्तरीय संस्थेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन पाण्याचे नियोजन केले व या कामी वन विभागाने साथ दिल्याने रोपे जगवली. परंतु यावर्षी मार्च महिन्यात उन्हाचा तडाका वाढत असून वन विभागाने पाण्याचे नियोजन न केल्याने येथील रोपे अंतिम घटका मोजत असून, झाडे जळाल्यास ग्रामस्थ तर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष इंजिनीयर गणेश बाबर यांनी सांगितले.
गतवर्षी वन खात्याने नियोजन व्यवस्थित केल्याने रोपांना पाणी मिळाले परंतु यावर्षी वन विभाग सांगोला यांना पाण्याचे नियोजन करा व रोपे जगवा या संबंधात पत्र व्यवहारी केला आहे व वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांना वारंवार सांगितले परंतु याकडे नियोजनाअभावी दुर्लक्ष झाल्याने रोपे जळण्याच्या मार्गावर असून, सध्या रोपांना पाणी घालणे गरजेचे आहे परंतु वन विभागाच्या रानटी धोरणामुळे 18000 झाडे अंतिम घटका मोजत आहेत. एकीकडे शासनाचे झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरण वाचवा असे संदेश असताना चोपडी येते मात्र यास हरताळ फासला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याचे व वरिष्ठ अधिकाऱ्याचे याकडे अधिकच दुर्लक्ष होत असल्याने माळरानावर हिरवळीने पसरलेले गतवर्षीचे रुपडे पालटत असून, मार्च महिन्यात ही अवस्था मग एप्रिल व मे महिन्यात या झाडांचे, रोपांचे काय होणार, सर्व झाडे जळण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांना पाणी नाही, मग शासन दरवर्षी नवीन रोपे लावणार व पाण्याअभावी जाळणार का असा प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत व यास जबाबदार कोण असा प्रश्न चोपडी ग्रामस्थ करीत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व न दिल्यास चोपडी ग्रामस्थ तर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष इंजिनिअर गणेश बाबर यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांना पाण्याचे नियोजन करा असे पाणी वाटप संस्थेतर्फे पत्र दिले आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे असे पाणी वाटप संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ व सचिव सुभाष खांडेकर यांनी सांगितले. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्याही टिप्पण्या नाहीत