अतुल फसाले पंचायत समिती चोपडी गण निवडणूक लढवणार
प्रतिनिधी : रविराज शेटे सांगोला
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण आहे . ग्रामणी भागात इच्छुक उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करता असताना चोपडी गणातून स्थानिक समाजकारणात आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग असलेले अतुल फसाले यांनी येत्या पंचायत समितीची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केली आहे. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी ही घोषणा केली असून या निर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले आहे. यापुर्वी नाझरे ग्रामपंचायची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. शेकाप- सेना युतीच्या विरोधात मोजक्या कार्यकर्त्यांनी मिळून २७३ मतापर्यंत आघाडी घेतली होती. काही मतांमध्ये निसटता पराभव झाला. नाझरे गावाचे माजी सरपंच हणमंत सरगर व विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जिद्द न सोडता गावातील सर्व नागरिकांच्या संपर्कात राहून काम चालूच ठेवले आहे. त्यामुळे आता त्याना पंचायत समितीचे निवडणूक लढविण्याचा आग्रह गावातील नागरिक करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी संघटना, शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून अतुल फसाले यांनी शिक्षण, शेती, पाणीपुरवठा आणि बेरोजगारी यांसारख्या लोकजीवनाशी निगडित प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांमुळे त्यांची ओळख कार्यकर्तामनाच्या नेत्याप्रमाणे निर्माण झाली आहे.
अतुल फसाले यांनी आपल्या निवडणूक घोषणेदरम्यान सांगितले की, प्रत्येक सरकारी योजना गरजू लोकांना मिळवून देणे, “गावोगावचा विकास, तरुणांना रोजगाराच्या संधी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस योजना आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझ्या कामकाजाचे मुख्य ध्येय असेल.”
त्यांच्या उमेदवारीमुळे पंचायत समितीच्या निवडणुकीत नव्या चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काही दिवसांत सर्वांच्या भेटी घेऊन अधिकृत प्रचार सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत