क्रांतीज्योती महिला सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेटवस्तू व लाभांश वाटप..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था शाखेच्या वतीने सभासदांना दीपावली निमित्त पाच किलो साखर, दोन किलो जेमिनी तेल, दोन किलो हरभरा डाळ, मोती साबण व कापडी पिशवी इत्यादी भेटवस्तू वाटप तसेच सभासदांना सहा टक्के लाभांश देण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सीए उत्तम बनकर, संस्थापक रामचंद्र बनकर, सीईओ गणेश माळी, संभाजी बनकर, चंद्रकांत बनकर, मा उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, उपसरपंच मधुकर ढोबळे, गणीसो काझी, पत्रकार रविराज शेटे , संस्थेचे संचालक, सल्लागार विजय आदाटे, के. आर. वाघमारे, नयना पाटील, साताप्पा शिंदे, अजित अडसूळ इत्यादींच्या उपस्थितीत भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी पतसंस्थेचा उपक्रम चांगला तसेच दिपवाळीनिमित्त सभासदांनाही भेटवस्तू मिळाल्या व नाझरे येथे शाखा हून एक वर्षात लाभांश वाटप त्यामुळे कौतुक करावे तेवढे थोडेच असे मा. उपसभापती सुनील चौगुले व पत्रकार रविराज शेटे यांनी मत व्यक्त केले.
सदर प्रसंगी केंद्रप्रमुख मच्छिंद्र भोसले, दिगंबर शिनगारे, सौ. रंजना शिनगारे, संजय लोखंडे, बाबा बनसोडे, राजू खोकले, वसंत आडसूळ, सौ. महादेवी ढोबळे, सौ. सविता बोराटे, विश्रांती बनसोडे, सौ सारिका अडसूळ शाखा अधिकारी तुषार बनकर, वैजनाथ अडसूळ, सचिन स्वामी, सभासद, नागरिक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार सल्लागार सुनील बनसोडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत