उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांचा श्रीदत्त मंदिर नाझरे, वझरे येथे सत्कार संपन्न..
नाझरे प्रतिनिधी
श्री दत्त मंदिर नाझरे, वझरे येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा क मधून ब मध्ये आणण्याचा प्रयत्न करू व यासाठी प्रस्ताव द्या, तो प्रस्ताव आपण पालकमंत्री जया भाऊ गोरे यांना सादर करू, तसेच पोलीस स्टेशन नाझरे ते श्री दत्त मंदिर रोड वर ब्लॉक उभारणीसाठी मदत करू व सध्या येथे सुरू असलेले संजीव स्वामी महाराज गादीस्थान व श्रीराम मंदिर दरबार बांधकामासाठी एक लाखाचा निधी लवकरच देऊ असे आश्वासन उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी सत्कार प्रसंगी दिले. मंदिर समितीच्या वतीने मा. उपसभापती सुनील चौगुले व दादासो वाघमोडे यांच्या वतीने एरंडे मालक यांचा सत्कार करण्यात आला.
नाझरे व वझरे येथील शेतकरी व नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी मान नदीवर पूल होणे गरजेचे आहे व या संबंधित अधिकाऱ्याकडून मोजमाप घेऊन पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री जया भाऊ गोरे यांच्याकडे पाठपुरावा करू असेही बाळासाहेब एरंडे यांनी सांगितले. यावेळी उद्योगपती उल्हास दादा धायगुडे यांनी मालकांच्या सानिध्यात त राहून विकास कामे करून घ्या व त्यासाठी ताकतीने त्यांच्या मागे उभे रहा असे आवाहन केले. तर आज पर्यंत सांगोला तालुक्यात सुमारे पंधरा कोटीचा निधी माध्यमातून विकास कामे सुरू आहेत असे युवा नेते प्रशांत वलेकर यांनी सांगितले. यावेळी नदीवर घाट बांधून द्या अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी नाझरे, वजरे व परिसरातील संजीव स्वामी महाराज भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत