सांगोला गौरव न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण (क्रीडा व सांस्कृतिक विभाग) आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा 2025 संपन्न झाली.
या जिल्हास्तरीय स्पर्धा गार्डियन स्कूल डोंबिवली येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील जवळपास पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये
14 वर्षांच्या आतील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये सक्षम वैभव गिते या विद्यार्थ्याने 5 राऊंड जिंकत सहावा क्रमांक पटकावल्याने गार्डियन स्कूल डोंबिवली येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या सहा क्रमांकांमध्ये आल्यामुळे सक्षम वैभव गीते या विद्यार्थ्यांची विभागावर होणाऱ्या कॅरम स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. सक्षम गीते यांना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री.महेश पुजारी यांनी प्रोत्साहित करून सहकार्य केले. सक्षम गिते याचे चुलते श्री.राहुल गिते यांच्या कडून कॅरम खेळण्याचे धडे व मार्गदर्शन मिळाले.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवलजी ऊके व रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी मोरे यांनी सक्षम गिते याचे अभिनंदन करून विभागावर होणाऱ्या पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे
शिक्षणाधिकारी श्री विजय सरकटे व कल्याणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गुजर यांनी सक्षम गिते याचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत