Breaking News

ॲड. रोहित एकमल्ली यांनी जिल्हा परिषद लढवावी अशी युवकांची जोरदार मागणी


पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील युवकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगलेली आहे – ॲड. रोहित एकमल्ली यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी. काही दिवसांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून अनेक नवे चेहरे राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे समाजकारणात सातत्याने कार्यरत असलेल्या आणि युवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी धावून जाणाऱ्या ॲड. रोहित एकमल्ली यांच्या उमेदवारीसाठी युवकांचा जोरदार आग्रह सुरू आहे.

गोर-गरीब, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत आले आहेत. गावकुसातील युवकांना पोलीस स्टेशनमधील अडचणी, शासकीय योजनांमधील अडथळे, दवाखान्यातील रुग्णांना मिळणारे अपुरे लाभ, महाविद्यालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या अवाजवी फी अशा विविध समस्यांवर ते निःस्वार्थपणे लढा देत आले आहेत. विद्यार्थ्यांना योग्य सवलती मिळाव्यात म्हणून त्यांनी अनेकदा मोफत प्रवेश मिळवून दिला आहे. कोणत्याही क्षणी मदत हवी असेल तर "रोहित एकमल्ली हे नक्की धावून येतील" असा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला आहे.

युवक नेते गणेश लोंढे यांनी सांगितले की, "ॲड. रोहित एकमल्ली हे उच्चशिक्षित असून वकील या नात्याने त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. त्यामुळे जर ते जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरले, तर प्रस्थापित नेत्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. त्यांनी आजवर केलेल्या समाजकारणामुळे युवकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी तेच योग्य उमेदवार ठरू शकतात."

युवकांचा असा विश्वास आहे की, जर ॲड. एकमल्ली यांना संधी मिळाली तर त्यांच्या माध्यमातून गोर-गरीब, वंचित, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवल्या जातील. उच्चशिक्षित तरुण नेते म्हणून ते तालुक्याच्या प्रगतीला नवे दिशा देऊ शकतात. शिक्षण, आरोग्य, रोजगार व शासकीय योजना याबाबत नेमके आणि ठोस निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

आजवर अनेक नेते केवळ निवडणुकीपुरतेच कार्यरत असल्याचे जनतेला अनुभवायला मिळाले आहे. मात्र ॲड. रोहित एकमल्ली यांनी निवडणूक नसतानाही सातत्याने समाजकारण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. युवकांनीच पुढे येऊन विकास साधायचा असेल, तर शिक्षित, प्रामाणिक आणि धडाडीचा तरुण पुढे यायला हवा, असे स्पष्ट मत स्थानिक युवकांनी मांडले आहे.

युवकांच्या चर्चेतून एकच सूर उमटतो आहे – "आमचा विकास करायचा असेल, तर आमच्या भागातून ॲड. रोहित एकमल्ली यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी." त्यामुळे आता त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत