Breaking News

श्रावण मासानिमित्त सांगोला येथे डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वचन संपन्न...


 सांगोला प्रतिनिधी 

       महात्मा बसवेश्वर हे शरण होते तर मन्मथ स्वामी हे माहेश्वर होते व आज सर्व वीरशैव बांधवांनी गळ्यात लिंग, कपाळावर भस्म लावून भगवान शिवाची भक्ती करून धर्माचे रक्षण करणे गरजेचे आहे व त्याचबरोबर आई-वडिलांची ही सेवा करा परंतु असे न होता सासू-सासर्‍याशी सेवा होते परंतु आई-वडिलांची होत नाही याचा अर्थ सासू-सासर्‍याची सेवा करू नका असे नव्हे तर त्याचबरोबर आई-वडिलांस विसरू नका हे महत्त्वाचे आहे असे डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेने आयोजित केलेल्या श्रावण मासानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय सांगोला येथे आशीर्वाचनात सांगितले. 

    यावेळी सायंकाळी पाच ते सात वीरशैव लिंगायत भजनी मंडळाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. तसेच महास्वामीची पाद्यपूजा सौ. व श्री सुमित मोहन चांदणे यांच्या शुभहस्ते तर स्टेजवर सौ. व श्री संदेश शिवदास पलसे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सुरुवातीस बसवेश्वर पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व भजनी मंडळांचा सत्कार महास्वामीच्या हस्ते करण्यात आला. तसेच महास्वामी चे स्वागत सौ. अनुपमा गुळवे यांनी केले तर महात्मा बसवेश्वर संघटनेचे वतीने महास्वामींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

     सदर प्रसंगी महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे सर्व सदस्य, वीरशैव लिंगायत समाज, अक्कमहादेवी महिला भजनी मंडळाचे सदस्य, महिला, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत