Breaking News

सांगोल्यात यलमार समाज आजी माजी सैनिक स्नेहमेळावा मोठया दिमाखात पार पडला


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:


माझ्या सैनिक राजा रे

जीव तुझा हातावर

जीवन तुझे हे खड़तर

देशाचा तू आधार

उन, पाऊसात, वाऱ्यात

कष्टतो देश राखण्यात

अहोरात्र तुम्ही कष्टात

जीवन देशासाठी अर्पित

सैनिक ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते. ते राष्ट्राचे रक्षक आहेत. सैनिक हा अत्यंत निस्वार्थीपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची रक्षा करतो. सैनिकाची कामगिरी खूप कठीण आहे.त्यांचे जीवन अत्यंत खडतर आहे. असे असले तरी, संकटांना न जुमानता ते नेहमीच त्यांचे कर्तव्य पार पाडतात.

दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी यलमार समाज आजी-माजी सैनिक स्नेहमेळावा सांगोला येथे मोठया दिमाखात पार पडला. मेळाव्यासाठी आजी-माजी सैनिकांनी आपल्या कुटुंबासोबत हजेरी लावली.

मेळाव्यासाठी पुणे,सोलापूर, सातारा, सांगली, या जिल्ह्यातून सैनिकांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरवात सकाळी ११ वाजता दिपप्रज्वलनाने झाली. ऑपरेशन सिंदूर मधील सहभागी सैनिकांचा सत्कार त्यानंतर विरपत्नी यांचा सत्कार तसेच २०२४-२५ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.सत्कारा नंतर सर्वांनी स्वतःचा परिचय देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

 जिल्हा सैनिक अधिकारी श्री संजय यलमार यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मध्ये येणाऱ्या अडचणी तसेच सैनिक पाल्य शिष्यवृत्तीबद्दल सखोल माहिती दिली . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश विटेकर यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री जनार्धन येलपले यांनी सर्व आजी-माजी सैनिकांच्या सहकार्याने  यशस्वीरित्या पार पडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत