Breaking News

नाझरे येथील मा. ग्राम. सदस्या सौ. कमल स्वामी यांचे निधन


 नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे ता. सांगोला येथील मा. ग्राम. सदस्या सौ. कमल शिवया स्वामी यांचे सोमवार दि. सात जुलै रोजी रात्री अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 65 होते. सेवानिवृत्त शिक्षक शिवया स्वामी यांच्या त्या पत्नी होत्या. 

        त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दि. नऊ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत