Breaking News

पायोनियर स्कूल (य).मंगेवाडी मध्ये लोकमान्य टिळक व संत सावता माळी यांची जयंती साजरी


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

       पायोनियर स्कूल येथे लोकमान्य टिळक व संत सावता माळी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली

   या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल येलपले सर, सर्व H.O.D.  स्पोर्ट डिपार्टमेंट चे हेड मोहन वाघमारे सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन वाघमारे सर उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व दीप प्रजवलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष रुपनर सर यांनी केले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचे वर्णन अतिशय सोप्या भाषेत केले. जहाल या शब्दाचा अर्थ मुलांना समजावून सांगितला. तसेच तुरुंगातील त्यांच्या प्रसंगाचे थोडक्यात सांगितला.

तसेच बबिता राऊत मॅडम यांनी लोकमान्य टिळकांच्या जन्मापासूनच पूर्ण इतिहास मुलांसमोर समजावून दिला. ते भारतीय काँग्रेसमधिल जहाल मतदारांचे प्रमुख नेते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ,हे त्यांचे प्रसिध्द घोषावाक्य समजावून देऊन जनजागृतीसाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना वाढावी म्हणून गणेशोत्सव व शिवजयंती असे उत्सव सुरू केले.समाजातील अनिष्ट रूढी परंपरा विरूध्द लढा देण्याचे काम केल्याचे सांगितले.

तसेच संस्थाध्यक्ष अनिल येलपले सर यांनी मुलांना लोकमान्य टिळक यांचा स्वतंत्र चळवळीतील कामगिरीचा आढावा मुलांना अतिशय सुंदर पध्दतीने समजावून सांगितला.

यांनतर अध्यक्षीय भाषणात लाल बाल पाल यांच्या नावाचे स्पष्टीकरण देत भारतीय स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप बाबर सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत