रायगड जिल्ह्यातील महाड येथे प्रांताधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी व एन.डी.एम.जे संघटनेची संयुक्त बैठक संपन्न
विशेष प्रतिनिधी: येताळा खरबडे
या बैठकीमध्ये महाड व पोलादपूर या तालुक्यांमध्ये मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करणे.
भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणे, संविधानातील प्रमुख तरतुदी प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये आठ कलमी कार्यक्रम राबवणे, सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत.
महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विकास करणे, महाड चवदार तळ्याचा व परिसराचा विकास करणे, महाड राष्ट्रीय स्मारकामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे. घरकुलांना शासकीय जागा मिळवून देणे, मागासवर्गीयांच्या अतिक्रमणे नियमानुकूल करणे, अशा विषयांवर दीड तास चर्चा झाली. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य सचिव वैभव गीते, रायगड जिल्ह्याचे नेते संजय सोनवणे, सातारा सम्राट चे संपादक गोविंद मोरे, सातारा जिल्ह्याचे नेते जय भैय्या माने, कर्जत तालुक्याचे नेते आनंद बबन जगताप हे उपस्थित होते.
वैभव गिते राज्य सचिव NDMJ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत