Breaking News

मंगळवेढा आगारात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी....


 

मंगळवेढा: येताळा खरबडे

महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व कृषीतज्ञ. ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. सन १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. पुढे सन १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते पहिले महसूल मंत्री होते. सन १९६२ च्या निवडणुकीनंतर ही कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते. पण कन्नमरावांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले . या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण शेती वगैरे बाबतीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. वसंतराव नाईक यांची जयंती मंगळवेढा आगारात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक संजय भोसले, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी,  सहाय्यक वाहतूक निरीक्षक रावसाहेब चव्हाण, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, वरिष्ठ लिपिक अमोल काळे, सचिन माने, वल्लभ ताटे तसेच ढगे डिजिटलचे मालक लहू ढगे, काशीद साहेब हे देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत