बापूसाहेबांची तत्त्वे आम्ही जपतो- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
नाझरा( वार्ताहर):-
आज सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उत्कर्ष सर्वांना दिसतो. दरवर्षी विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांचा गुणात्मक आलेख उंचावताना दिसत आहे या उत्कर्षाच्या पाठीमागे बापूसाहेबांनी घालून दिलेल्या तत्वाची संजीवनी आहे.संस्थेच्या उभारणीत कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी जी तत्वे घालून दिली आहेत ती तत्वे आम्ही जपतो असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रबुद्धचंद्र झपंके यांनी केले.
दैनिक सकाळ गौरवगाथा गौरव भूमिपुत्रांचा प्राईड ऑफ सोलापूर व दैनिक दिव्य मराठी पॉवर 50 अशा सोलापूर जिल्ह्यातील दोन दैनिकांनी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना सन्मानित करण्यात आले होते.त्या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ नाझरा विद्यामंदिर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.,यावेळी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, रविराज शेटे यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ओंकार वाघमारे या विद्यार्थ्याने ढोलकीचे बोल वाजवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर संभाजी सरगर, शुभांगी नागरसे,सुदर्शन माने व दहावी ब मधील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्राचार्य बिभिषन माने यांनी कार्यक्रमाचा मुख्य हेतू विशद करत उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी जागतिक लिंगायत महासभा सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविराज शेटे,सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे,नूतन पर्यवेक्षक विनायक पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्राचार्य बिभीषण माने यांच्या हस्ते सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत