आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते य.मंगेवाडी येथे वृक्षारोपण संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून हरित सोलापूर, समृध्द सोलापूर अभियानांतर्गत सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे य.मंगेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमातच पायोनियर शैक्षणिक संकुल चे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर यांचे चिरंजीव ओम येलपले याचा वाढदिवस त्याच्या हस्ते एक झाड लावून केक न कापता झाड जोपासण्याचा संकल्प करून आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा केला.
यावेळी आ.सुभाष बापू देशमुख यांनी प्रत्येकाने एक झाड लावून ते जपले पाहिजे तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल असे सांगून निसर्गाचे संवर्धन कसे करावे हे पटवून सांगितले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन चे पदाधिकारी, ॲड.गजानन भाकरे,माजी सरपंच प्रकाश सोळसे, माजी सरपंच दत्तात्रय मासाळ, पायोनियर शैक्षणिक संकुल चे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर, बाळूआप्पा येलपले, रामभाऊ येलपले,भागवत सोळसे,पायोनियर गुरुकुल चे प्राचार्य डॉ अमोल रणदिवे सर, अजित येलपले,विकास येलपले,समाधान येलपले, पायोनियर निवासी गुरुकुलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी व य.मंगेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत