वालचंदनगर पोलिसांचा रूट मार्च ; आगामी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन.
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम.
वालचंदनगर :- गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती सणांच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने सायंकाळी सहा वाजता भव्य रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन कडील पाच अधिकारी बावीस अंमलदार सहभागी झाले होते. याची सुरुवात पोलीस ठाण्यापासून झाली त्यानंतर हे संचलन जंक्शन, लासुर्णे गावातील बाजारपेठ या भागातून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस ठाण्यावर येऊन झाले. संपूर्ण रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. या रूट मार्च मुळे गावांतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास वाढला असून, नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. गावामध्ये शांतता राखण्यासाठी प्रशासनाची ही हालचाल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत