Breaking News

१६ एप्रिल २०२३

धम्म गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार नवदारे येथे महामानवास अभिवादन..


 प्रतिनिधी - संतोष कदम.

लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब

आंबेडकर 

 यांची 132 वी जयंती आज जगभर मोठ्या उत्साहात  साजरी  होत आहे.

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 

 धम्मगुरु डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार नवदारे  येथे अभिवादन सभेचे आयोजन  राहुल मित्र मंडळ व बुद्ध विहार व्यवस्थापन समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक आयु. ब्रह्मदेव कांबळे व आयु. ढोबळे  यांच्या हस्ते करण्यात आले. व सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .

याप्रसंगी मा. प्रा. सदाशिव सूर्यगंध सर‌,

मा. बी. एम कांबळे सर , मा.संतोष लहु कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.किरण काटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उमेश चव्हाण, आप्पा गोतसूर्य ,वैभव वाघमारे, अमित ढोबळे, महादेव बनसोडे, योगेश आठवले,राजेश साळवे,गणेश कांबळे,मंगेश काटे,सौरभ आवाड, बापु गोतसुर्य,श्रीमंत जाधव,किर्ती कांत तोरणे,बबलु कदम यांच्यासह अनेक भिमसैनिक व कार्यकर्ते  मोठ्या संख्येनेउपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा