Breaking News

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या विधी सल्लागारपदी ॲड.गुरू बिराजदार


 सांगोला प्रतिनिधी 

 महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या विधी सल्लागार पदावर  मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील श्री.गुरूबाळा बिराजदार यांची निवड झाली आहे.त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

              महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी ॲड.गुरू बिराजदार यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी येथील प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित असलेले गुरू बिराजदार हे कृषी पदवीधर  विधी पदवीधारक असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात अभ्यासपूर्ण वकिली व्यवसाय करीत आहेत.

              महात्मा बसवेश्वर स्मारकाची निर्मिती आपल्या मंगळवेढ्यात व्हावी ही त्यांची खूप मोठी तळमळ आहे.त्यासाठी ते प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करतात.बसवेश्वर महाराजांचे आदर्श विचार समाजमनात बिंबविण्यासाठी मंगळवेढ्यातची संतभूमी पर्यटन क्षेत्र होण्यासाठो ते सदैव कार्यरत असतात.म्हणूनच त्यांची विधी सल्लागार या पदावर नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत